इंग्लंडमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आला आहे. तिथली परिस्थिती हाताबाहेर गेली आहे असं खुद्द तिथल्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अशा परिस्थितीत कोणतीही हयगय न करता तातडीने तिथल्या विमानांवर बंदी घालावी. तसंच बोरीस जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनी जे निमंत्रण दिलं आहे तेपण रद्द करावं, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
‘बोरीस जॉन्सन यांचं आपण योग्यवेळी स्वागत करुच पण आरोग्याच्या बाबतीत अशा पद्धतीने तडजोड करता कामा नये. अशाच पद्धतीची तडजोड डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यात झाली. याचवेळी सरकारने लॉकडाऊन घोषित करण्यात दिरंगाई केली. त्याता फटका महाराष्ट्राला सर्वाधिक बसला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘प्रजासत्ताक दिनाच्या जवळपास विषाणूचा प्रादुर्भाव वाढला तर बोरिस जॉन्सन यांचा दौरा रद्द केलं पाहिजे. भारतातील जनतेचा जीव वाचवणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. राजकीय औपचारिकतेवर अवलंबून न राहता आरोग्य खात्यानं व परराष्ट्र मंत्र्यांनी योग्य तो निर्णय घेण्यात यावा, असंही चव्हाण यांनी नमूद केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times