नाशिकमधील मद्य व्यापारी अतुल मदन याचा मद्यसाठा पकडून ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागही अवैध आणि बनावट दारू साठ्यांवर कारवाया करण्यासाठी सक्रीय झाला आहे. गेल्या काही दिवसांत अनेक कारवाया करून लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य विक्रीला चाप लावण्यासाठी गुजरात तसेच दीव दमण बॉर्डरवर पथके नेमली आहेत. सोमवारी पहाटे सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने एका संशयित ट्रकची तपासणी केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर देशी आणि विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आले. ट्रकसह सुमारे ५० लाख रुपये किंमतीचे मद्य जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातील सूत्रांनी दिली आहे. या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून आम्ही अवैध मद्य वाहतूक आणि विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धडक मोहीम सुरू केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. देशी, विदेशी मद्यासह मोठ्या प्रमाणावर बिअरचे बॉक्स जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times