मुंबई : युरोपात करोनाचा प्रकोप झाल्यानंतर आज सोमवारी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने ५०० रुपयांनी तर चांदीमध्ये तब्बल ३३०० रुपयांची वाढ झाली होती.

गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदीमध्ये तेजी कायम आहे. शुक्रवारी त्यात काहीशी नफावसुली झाली होती. मात्र युरोपात करोनाने डोकं वर काढल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. नव्या करोना व्हायरसने लंडनमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथील सरकारने पुन्हा लॉकडाउन घोषित केला आहे. खबरदरीचा उपाय म्हणून भारत सरकारने ब्रिटन दरम्यानची विमान सेवा खंडीत केली आहे. या घडामोडीनी गुंतवणूकदारांच्या मनात धास्ती निर्माण झाली. त्यांनी भांडवली बाजारात जोरदार विक्रीचा सपाटा लावला आहे. तर दुसरीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीची खरेदी वाढवली आहे.

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०५५० रुपये आहे. त्यात २१६ रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी दिवसभरात सोने ५१००० रुपयांवर गेले होते. एक किलो चांदीचा भाव ६८३७८ रुपये आहे. त्यात ४७१ रुपयांची वाढ झाली आहे. त्याआधी चांदीचा भाव ७१६५० रुपयांपर्यंत वाढला होता. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीमध्ये वाढ झाली होती. एमसीएक्सवर तीन सत्रात चांदीमध्ये ३४०० रुपयांची वाढ झाली होती. तर तीन दिवसात सोने १००० रुपयांनी वधारले होते.

good returns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९३७० रुपये आहे. त्यात ६५० रुपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट चा भाव ५०३७० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९२५० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५३७२० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४७६९० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५२०३० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९४३० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५२१३० रुपये आहे. जागतिक कमाॅडिटी बाजारात सोन्याचा भाव प्रती औंस १९०३ डाॅलर आहे. चांदीचा भाव प्रती औंस २७.४९ डाॅलर आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here