नवी दिल्लीः देशातील बिबट्यांची संख्या गेल्या ४ वर्षात २०१८ मध्ये १२,००० च्या वर गेली आहे. ही संख्या २०१४ मध्ये ८००० च्या जवळपास होती. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी ही माहिती दिली. बिबट्यांशिवाय वाघ आणि सिंहांची संख्याही देशात वाढली आहे. देश आपल्या पर्यावरणाच्या आणि जैवविविधतेचं चांगलं संरक्षण करत असल्याचं यातून दिसून येतं, असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर ( ) म्हणाले.

‘भारतातील २०१८ मधील बिबट्यांची स्थिती’ ( Status of Leopard in India 2018 ) या विषयावरील अहवाल जावडेकर यांनी जाहीर केला. फोटो काढून बिबट्यांची संख्या मोजण्यात आली. २०१४ मध्ये बिबट्यांची संख्या ८,००० होती, असं ते म्हणाले. वाघ, आशियाई सिंह आणि आता बिबट्यांच्या संख्येत होणारी वाढ यातून भारत आपलं पर्यावरण, पर्यावरणीय स्थिती आणि जैवविविधतेचे संरक्षण किती उत्तम प्रकारे करतो, हे यातून सिद्ध होत असं जावडेकर म्हणाले.

मध्य प्रदेशात पहिल्या क्रमांकावर

२०१८ मध्ये भारतात बिबट्यांची संख्या १२, ८५२ होती. यापैकी ४४२१ बिबटे मध्य प्रदेशात आढळून आले आहेत. त्यांची संख्या कर्नाटकात १,७८३ आणि महाराष्ट्रात १,६९० आहे. मध्य भारत आणि पूर्व घाटात बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे. जी ८,०७१ इतकी आहे. या क्षेत्रात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि केरळ अशा पश्चिम घाट क्षेत्रात ३,३८७ बिबटे आहेत. तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि बिहार व्यापलेल्या शिवालिक आणि गंगेच्या मैदानामध्ये १,२५३ बिबटे आढळून आले आहेत. ईशान्य डोंगराळ प्रदेशात फक्त १४१ बिबटे आढळले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here