भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा चांगल्या फॉर्मात होता. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी सामन्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या पायाचे स्नायूही दुखावले गेले होते. त्यामुळेच जडेजाला पहिल्या कसोटी सामन्यात स्थान देण्यात आले नव्हते. पण त्याची उणीव मात्र संघाला नक्कीच जाणवत होती. त्यामुळे आता जर दुसऱ्या कसोटी सामन्यात जर त्याला खेळवायचे असेल तर त्याच्या फिटनेस टेस्टचा निकाल काय येतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, ” जर जडेजा गोलंदाजीचे मोठे स्पेल टाकण्यासाठी फिट असेल तर नक्कीच त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात येईल. जडेजाला जर संघात खेळवायचे असेल तर कदाचित हनुमा विहारीला संघाबाहेर जावे लागेल. पण जडेजा संघात आला तर भारतीय संघाला यावेळी पाच गोलंदाजांचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे जडेजा फिट असले तर नक्कीच त्याला संघात स्थान देण्यात येईल.”
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघ सध्या कसोटी मालिका खेळत आहे. चार सामन्यांपैकी पहिली एडिलेड येथील डे-नाइट कसोटीत भारताचा ८ विकेटनी पराभव झाला. आता दुसरी कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. या कसोटीला बॉक्सिंग डे कसोटी असे देखील म्हटले जाते. आता सर्व सामान्य क्रिकेट चाहत्यांना हा प्रश्न पडणे स्वाभावीक आहे की कसोटी क्रिकेट तर ठिक आहे पण यातील बॉक्सिंगचा अर्थ काय. तर यातील बॉक्सिंगचा आणि बॉक्सिंग खेळाचा काहीही संबंध नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times