ऑकलंड: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ५ सामन्यातील पहिल्या टी-२० सामना ईडन पार्क मैदानावर होणार आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. न्यूझीलंड गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. या पराभवानंतर भारत प्रथमच न्यूझीलंडविरुद्ध खेळत आहे.
Live अपडेट-
>> कॉलिन मुन्रोचे अर्धशतक, ३७ चेंडूत केल्या ५० धावा
>> १० षटकात न्यूझीलंडच्या १ बाद ९१ धावा
>> ८ षटकात न्यूझीलंडच्या १ बाद ८१ धावा
>> न्यूझीलंडची पहिली विकेट! रोहित शर्माने मार्टिन गप्टिलचा घेतला शानदार कॅच
>> ५ षटकात न्यूझीलंडच्या ०-५० धावा
>> न्यूझीलंडची दमदार सुरूवात, ३ षटकात ०-२६ धावा
>> न्यूझीलंडच्या डावाला सुरूवात
>> भारताने टॉस जिंकला; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times