नवी दिल्लीः ब्रिटनमध्ये करोना व्हायरसच्या ( ) नव्या प्रकारामुळे ( ) कुठेतरी स्थिरस्थावर होत असलेल्या जगाला धक्का बसला आहे. पहिल्या व्हायरसपेक्षा कितीतरी वेगाने पसरण्यास सक्षम आहे. यामुळे सर्वच देश सावध झाले आहेत. भारतासह अनेक देशांनी काही दिवसांसाठी ब्रिटनची विमानसेवा स्थगित केली आहे. दरम्यान, नवीन करोना व्हायरसवर एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया ( ) यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.

ब्रिटनमधील करोनाच्या नव्या व्हायरसबद्दल त्यांनी निरीक्षण केले आहे. नवीन करोनाचा प्रादुर्भाव लंडन आणि दक्षिण ब्रिटनमध्ये आढळून आला आहे. या नवीन करोनाचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्याने होत आहे. पण रुग्णांची गंभीरता वाढलेली नाही. या नवीन व्हायरसमुळे संसर्गाचा वेग वाढला आहे. जिथे जिथे व्हायरस असेल तिथे त्याचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्याने होतोय. म्हणूनच हा व्हायरस इतर देशांमध्ये पसरता कामा नये. यामुळेच अनेक देशांनी ब्रिटनची विमानसेवा बंद केली आहे. तसंच जे कुणी ब्रिटनमधून येत आहेत त्यांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत आणि बारकाईने नजर ठेवली जात आहे, असं एम्सचे संचाल रणदीप गुलेरिया म्हणाले.

भारतात नवीन करोनाचा एकही रुग्ण आतापर्यंत समोर आलेला नाही. पण आता जे रुग्ण समोर येत आहेत त्यांची चाचणी करणं फार महत्वाचं आहे. कारण आतापर्यंत आपण फक्त पॉझिटिव्ह आहे की नाही, हे तपासत होतो. मात्र आता आपल्याला काही प्रमाणात व्हायरसचा जेनेटिक सीक्वेन्सही बघावा लागणार आहे. खासकरून ब्रिटनमधून येणाऱ्यांमध्ये हा जेनेटिक सीक्वेन्स तर नाही ना हे तसापासावं लागेल. असेल तर त्यांना तातडीने आयसोलेट करून त्यांच्यावर बारकाईन नजर ठेवून त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती काढून समाजात हा व्हायर पसरण्यापासून रोखावा लागले, असं डॉ. गुलेरिया म्हणाले.

भारतात करोनाचे रुग्ण कमी होत आहेत. पण जगातील बर्‍याच देशांपेक्षा चांगल्या स्थितीत आहोत. अशा परिस्थितीत आपण सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. प्रो-अ‍ॅक्टिव असणे खूप महत्वाचे आहे. इतक्या कष्टानंतर आपण जे यश मिळवले आहे ते थोड्याशा हलगर्जीपणामुळे गमवून बसू. यामुळे नवीन करोना प्रादुर्भाव देशात होऊ नये यासाठी अधिक सतर्क आणि सावध असलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. ‘आज तक’ ला त्यांनी ही मुलाखत दिली.

ब्रिटनमधील नव्या करोनाने जगात इतकी का चिंता आहे? असा प्रश्न गुलेरिया यांना केला गेला. कारण नवीन करोना व्हायरसचा प्रादुर्भाव हा अतिशय झपाट्याने होत असल्याचं ब्रिटन सरकारनेच मान्य केलं आहे. यामुळे आपणही याची काळजी घेतली आहे. ज्या ठिकाणी हा नवीन करोना व्हायरस आढळला आहे तिथे करोनाचे रुग्ण वाढले आहेत, असं उत्तर गुलेरिया यांनी दिलं. पण करोना रुग्ण वाढण्याचे वेगळे कारणही असून शकते. गर्दीची ठिकाणं, मास्क न घालणं आणि इतर काही कारणं असू शकतात. यामुळे आपल्याला अधिक माहिती हवी आहे. नवीन करोना व्हायरस झपाट्याने प्रादुर्भाव करणारा आहे की इतर कारणांमुळे संसर्ग वाढतोय, हे माहितीवरून स्पष्ट होऊ शकेल. पण तोपर्यंत आपण सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे, असं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here