जम्मू : जम्मू-कश्मीरमध्ये आठ टप्प्यांमध्ये पार पडलेल्या जिल्हा विकास परिषद (DDC Election Result)निवडणुकीचा आज निकाल घोषित केला जाणार आहे. या मतगणनेत २८० डीडीसी जागांसाठी तब्बल २१७८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले होते. जनतेनं आपली मतं भाजपच्या पारड्यात टाकलेत की ”च्या हे आज स्पष्ट होईल.

LIVE अपडेट

सकाळी ९.०० वाजता :

– जिल्हा विकास परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

सकाळी ८.०० वाजता :

– मतगणनेला सकाळी ९.०० वाजता सुरुवात होणार आहे. केंद्र शासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये या निवडणुकीसाठी एकूण ५१.४२ टक्के मतदान झालं होतं. आज ३० लाखांहून अधिक मतांची गणना विभागीय केंद्रांवर केली जाईल.

– राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुासर जिल्हा विकास परिषद (डीडीसी) च्या निवडणुकीचे निकाल ऑनलाईन पाहिले जाऊ शकतात. या २८० डीडीसी निवडणुकांच्या मतदानाचा कल, पक्ष आणि अंतिम निकाल http://ceojk.nic.in या वेबसाईटवर पाहिले जाऊ शकतात.

पीडीपी नेत्यांना घेतलं ताब्यात

सोमवारी सायंकाळी पीडीपीच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याला ताब्यात घेण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, पीडीपी नेता नईम अख्तर यांना ताब्यात घेण्यात आलंय. यानंतर महबूबा मुफ्ती यांनी भाजपवर डीडीसीच्या निवडणुकीच्या निकाल फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय. यापूर्वी पीडीपीच्या दोन नेत्यांना दक्षिण कश्मीरमध्ये ताब्यात घेण्यात आलंय. म्हणजेच, एकून तीन पीडीपी नेते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. राज्यात कायदे-व्यवस्था कायम राखण्यासाठी या नेत्यांना ताब्यात ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here