‘मॉडर्ना’द्वारे विकसित करण्यात आलेली लस अमेरिकेत दाखल झाली असतानाच बायडेन यांनी लशीचा पहिला डोस घेतला. अमेरिकेस यापूर्वी फायझर कंपनीचीही लस प्राप्त झाली आहे. बायडन यांना फायजर-बायोएनटेकची लस देण्यात आली. करोनाने आत्तापर्यंत ३ लाख १७ हजार अमेरिकींचे बळी घेतले आहेत. फायझर व मॉडर्ना या कंपन्यांच्या लशी उपलब्ध होत असूनही अमेरिकी नागरिकांमध्ये या लसीकरणाबाबत कमालीची साशंकता आहे. लसीकरणामुळे शरीरास अन्य अपाय होत असल्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, बायडेन यांनी थेट लाइव्ह येत लस टोचून घेतली.
वाचा:
प्राधान्यक्रम मोडून लस घेण्याचा माझा हेतू नाही. मात्र हे लसीकरण किती सुरक्षित आहे, हे देशवासीयांना दाखवण्यासाठी तसे करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच मी जाहीरपणे लस घेणार असल्याचे बायडन यांनी याआधीच स्पष्ट केले होते. बायडेन यांची पत्नी जिल यांनाही त्यांच्यासोबत लस देण्यात येणार आहे.
वाचा: अमेरिकेत करोनाचा सर्वाधिक संसर्ग फैलावला आहे. अमेरिकेत एक कोटी ७० लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेत एकाच दिवसांत तब्बल चार लाख करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेत पुढील महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांना लस देण्यास सुरुवात होणार आहे. सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांसह संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्यांना लस दिली जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times