LIVE अपडेटस् :
– शेतकऱ्यांसोबत चर्चा करताना मोदी सरकारचा अहंकार आडवा येताना दिसतोय. भारतीय शेतकऱ्यांना मागण्या योग्य आहेत, सरकारनं अहंकार सोडून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात. तसा कोणताही प्रस्ताव दिसून येत नाही. सरकारनं त्वरीत मागे घ्यावेत : आप नेते राघव चड्ढा
– शेतकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केलंय. ज्या ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे तिथले शेतकरी उपोषणावर बसत आहेत.
– सिंघु सीमेवर एका वयोवृद्ध शेतकऱ्यानं विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या शेतकऱ्याचं नाव निरंजन सिंह असं आहे. ते पंजाबच्या तरनतारणचे रहिवासी असल्याचं सांगण्यात येतंय. सोमवारी दुपारी १२.४५ वाजता ही घटना घडली. त्यानंतर घाईघाईनं निरंजन सिंह यांना रोहतकच्या पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. धोका टळल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. विष घेण्यापूर्वी निरंजन सिंह यांनी एक सुसाईड नोटही लिहिली होती.
– शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले ‘स्वराज इंडिया’चे संयोजक योगेंद्र यादव यांना पितृशोक झालाय. योगेंद्र यादव यांचे पिता प्रो. देवेंद्र सिंह यादव (९१ वर्ष) यांच्या पार्थिवावर आज दुपारी २.०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वाचा :
– शेतकरी आंदोलन २१ व्या दिवशीही सुरूच आहे. मंगळवारी सकाळीच आंदलकांकडून एनएच ९रोखण्याता आला. एनएच ९ दिल्ली – मेरठला जोडतो. दिल्लीकडून गाझियाबादला येणाऱ्या रस्त्यावर शेतकऱ्यांनी ठाण मांडलंय. काल दुपारीही हा रस्ता जाम करण्यात आला होता. कुठार, पूरणपूर इथून उत्तर प्रदेश सीमेकडे निघालेल्या आंदोलकांच्या ट्रॉली रोखण्यात आल्याचं आंदोलकांनी म्हटलंय. त्यानंतर शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरलेत. ॉ
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times