अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. न्यूयॉर्कमधील ४३ वर्षीय फराह खेमिली यांना करोनाची बाधा झाली होती. त्यांनी आजारावर मातही केली. मात्र, एक दिवस त्यांना दाताचा त्रास जाणवू लागला. त्यांनी दाताला बोट लावल्यानंतर दात हलत असल्याचे आढळून आले आणि काही वेळेतच दात तुटला असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचा:
करोनाच्या संसर्गामुळे आपल्याला दात गमवावा लागला असल्याचा दावा फराह यांनी केला. फराह यांच्या दाव्याबाबत डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी मते नोंदवली आहेत. करोनाच्या संसर्गामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेवर परिणाम झाला असावा. त्यामुळेच सूज येणे, केस गळणे, दात तुटला असावा अशी शक्यतादेखील वर्तवण्यात आली. करोनाच्या परिणामी दातांची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. रूग्ण करोनाच्या संक्रमणातून बरे होतात. मात्र, त्यांना अशा आजारांमुळे दीर्घकाळ दुष्परिणामांना तोंड द्यावे लागत असल्याचे उताह विद्यापीठाचे डॉ. डेविड ओकनो यांनी सांगितले.
वाचा:
काही तज्ज्ञांच्या मते करोनामुळे दातांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेतील वय वर्ष ३० व त्याहून अधिक असलेल्या लोकांपैकी सुमारे ४७ टक्केजणांना एखादा आजार असतो. यामध्ये दात, हिरड्या यांच्या समस्यांना यांना सामोरे जावे लागते असे सीडीसीच्या २०१२ च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
वाचा:
कोविडच्या आजारावर मात केल्यानंतर बाधितांच्या प्रकृतीवर काय परिणाम होतोय, त्यांना काही त्रास आहे का याकडे लक्ष देत असल्याचे रक्तवाहिन्यांशी संबंधित आजाराचे डॉ. विलियम ली यांनी सांगितले. तर, दुसरीकडे करोनामुळे दातांवर असा काही परिणाम होत नसल्याचाही दावा करण्यात आला आहे. याबाबत अधिक पुरावे आणि संशोधनाची आवश्यकता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
दात तुटलेल्या फराह खेमिली यांना याआधीदेखील दातांचा त्रास जाणवत होता. याआधी केलेल्या दंतचाचणीत हिरड्यांमध्ये संसर्ग झाला नसल्याचे आढळून आले होते. मात्र, धुम्रपानाच्या सवयीमुळे दातांवर परिणाम होत असल्याचे समोर आले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times