मुंबई: भारतीय क्रिकेटपटू नव्या वादात सापडला आहे. रैनासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच असलेल्या ड्रॅगनफ्लाय पबमध्ये सुरेश रैनासह उपस्थित असलेल्यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या पबवर पोलिसांनी धाड टाकली. त्यानंतर रैनासह ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सुरेश रैनासह बॉलिवूड सेलिब्रिटी अशा एकूण ३४ जणांविरोधात पोलिसांनी कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या पबमध्ये कोविड नियम पायदळी तुडवल्याचा आरोप आहे. कुणीही मास्क लावला नव्हता. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम धुडकावून लावले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पार्टीत दिग्गजांसह बॉलिवूड सेलिब्रिटीही सहभागी झाले होते. मात्र, कुणाचेही नाव अद्याप समोर आलेले नाही.

क्लबच्या संचालकावरही कारवाई करण्यात आली आहे. सुरेश रैना हा या वर्षात विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे. यूएईत झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या काही दिवस आधीच ऑगस्टमध्ये रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here