ड्रॅगनफ्लाय क्लबमध्ये पहाटेपर्यंत पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीसीपी जैन आणि पीआय यादव यांच्यासह सहार पोलिसांनी छापा टाकला. या पार्टीत कोविड १९ नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. पार्टीत सहभागी झालेल्यांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणी सुरेश रैनासह इतर ३४ जणांविरोधात गुन्हा नोंदवला. ३४ पैकी १९ जण हे दिल्ली आणि पंजाबमधील, तर उर्वरित दक्षिण मुंबईतील राहणारे आहेत.
रिपोर्ट्सनुसार, काही सेलिब्रिटींविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतेच महाराष्ट्र सरकारने २२ डिसेंबर २०२० ते ५ जानेवारी २०२१ या कालावधीसाठी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यानंतर काही तासांतच ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर मुंबई पोलिसांनी जबरदस्त ट्विट केले आहे. कारवाईबद्दल माहिती देताना ”Party (Nahin) Chalegi Till Six In The Morning!” पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग, असे ट्विट पोस्ट करत कारवाईची माहिती दिली आहे. या कारवाईचे नेटकऱ्यांनी स्वागत केले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times