बोल्सोनरो यांनी म्हटले की, फायजरसोबतच्या करारानुसार साइड इफेक्ट झाल्यास त्याला कंपनी जबाबदार नसणार. मग, लस घेतल्यानंतर तुमचे रुपांतर मगरीत झाले तर ती तुमची समस्या आहे. तुम्ही सुपर ह्यूमन झालात, महिलांना दाढी आली किंवा पुरुषांचा आवाज महिलांसारखा झाला तरी त्याची जबाबदारी कंपनीवर नसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात करताना बोल्सोनारो यांनी सांगितले की, लस मोफत असणार मात्र, लस घेणे अनिवार्य नसणार. लस घेणे आवश्यक असले तरी लोकांना याची सक्ती करता येणार नसल्याचे नुकतेच सुप्रीम कोर्टाने म्हटले होते.
वाचा: स्वत: लस घेणार नाही
ब्राझीलमध्ये करोनाबाधितांची संख्या ७१ लाखांहून अधिक झाली आहे. तर एक लाख ८५ हजार जणांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. बोल्सोनारो यांनी आपण लस घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. बोल्सोनारो यांना जुलै महिन्यात करोनाची बाधा झाली होती.
वाचा:
दरम्यान,
घेणे सुरक्षित असल्याचे देशवासीयांना पटवून देण्यासाठी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन जाहीरपणे स्वत:ला लस टोचून घेतली आहे. ७८ वर्षीय बायडन यांचा समावेश करोनाच्या हायरिस्क ग्रुपमध्ये होतो. बायडन यांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. बायडन लस घेत असतानाची दृष्ये थेट प्रसारीत करण्यात आली.
‘मॉडर्ना’द्वारे विकसित करण्यात आलेली लस अमेरिकेत दाखल झाली असतानाच बायडेन यांनी लशीचा पहिला डोस घेतला. अमेरिकेस यापूर्वी फायझर कंपनीचीही लस प्राप्त झाली आहे. बायडन यांना फायजर-बायोएनटेकची लस देण्यात आली. करोनाने आत्तापर्यंत ३ लाख १७ हजार अमेरिकींचे बळी घेतले आहेत. फायझर व मॉडर्ना या कंपन्यांच्या लशी उपलब्ध होत असूनही अमेरिकी नागरिकांमध्ये या लसीकरणाबाबत कमालीची साशंकता आहे. लसीकरणामुळे शरीरास अन्य अपाय होत असल्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, बायडेन यांनी थेट लाइव्ह येत लस टोचून घेतली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times