नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन नवीन करोना व्हायरसबद्दल ( ) माहिती दिली आहे. नवीन करोना व्हायरसमुळे ( ) सध्या तयार करण्यात येत असलेल्या लसींवर कोणताही परिणाम होणार नाही. करोना व्हायरसमध्ये कुठलाही बदल ( ) झाला तरी यावर लस प्रभावी ठरतील. चिंता करण्याची आणि घाबरून जाण्याचीही गरज नाही. नवीन करोना व्हायरसचे कुठलेही संकेत आपल्या देशात आढळून आलेले नाहीत, असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलंय.

ब्रिटनमधील नवीन करोना व्हायरसमुळे झपाट्याने प्रादुर्भाव होत असल्याचं दिसून आलं आहे. एकमेकांपासून संसर्ग अधिक होतोय. तो एक सुपर स्प्रेडर बनत आहे. पण यामुळे रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण किंवा रुग्णालयात दाखल होण्याचा धोका वाढलेला नाही. व्हायरसमध्ये बदल होतात आणि बर्‍याच व्हायरसचे स्वरूप असेच असते, जे फार महत्वाचे नाही, असं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं.

व्हायरसमध्ये बदल होत असतात. पण प्रत्येक बदल महत्त्वाचा असतोच, असं नाही. आता करोना व्हायरसमध्ये १७ बदल दिसून आले आहेत. आपल्या शरीरात प्रवेश करण्याची या नवीन व्हायरसची क्षमता अधिक आहे. त्याचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्याने होतो. हा व्हायरस सुपर स्प्रेडर बनला आहे. पण महत्त्वाचं म्हणजे यामुळे रुग्ण गंभीर होत नाही. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या तेवढी गरज नाहीए आण मृत्युही वाढलेले नाहीत, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी नवीन व्हायरसबद्दल सांगितलं.

घाबण्याची गरज नाही. पण सावध राहण्याची गरज आहे. उपचारांच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोणताही बदल होणार नाही. तसंच नवीन करोना व्हायरसमुळे लस विकसित करण्यावर आणि तिच्या क्षमतेवर कुठलाही परिणाम होणार नाही, असं व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here