अमरावती: अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील शेतकऱ्याने संत्रा विक्रीच्या प्रकरणात फसवणूक झाल्याने महाराष्ट्रा राज्यमंत्री माननीय नामदार ( ) यांच्या नावाने न्याय मिळण्याकरिता अखेरची चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याने ( ) अंजनगाव सुर्जी तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील शेतकरी अशोक पांडुरंग भुयार वय ५५ या शेतकऱ्याने धनेगाव येथील आपल्या शेतातील संत्र्याचा बार अंजनगाव सुर्जी येथील दोन व्यापाऱ्यांना विकला होता, सदर शेतकऱ्याला सदर व्यापाऱ्यांनी शेतामध्ये दारू पाजून संत्रा विक्रीचे पैसे न देता पावतीवर जबरदस्तीने सही घेऊन संत्रा व्यापाऱ्यांनी मारहाण केली. त्याबाबतची तक्रार देण्यास धनेगाव येथील पोलीस पाटील व सदर शेतकरी अशोक भुयार हे अंजनगाव पोलीस स्टेशनला दि. १८ डिसेंबर रोजी गेले असता त्याठिकाणी तक्रार कर्त्याला बी ट जमदार ठाणेदार यांनी मारहाण केल्याची मृत्युपूर्व चिठ्ठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावेअशोक भुयार यांनी लिहून अंजनगाव तालुक्यातील बोराळा गणपती मंदिराच्या परिसरातील एका शेतामध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. सदर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच शेकडो नागरिक पोलीस स्टेशन अंजनगांवमध्ये जमले होते.हे प्रकरण संत्रा व्यापारी याने पैसे न दिल्याने घडल्याचा चिठ्ठी मध्ये उल्लेख आहे आहे.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून जामखेड तालुक्यातील शेतकरी कैलास रामचंद्र नेमाने (वय ४०) यांची लिंबाच्या झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here