नवी दिल्ली : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलचा आज विवाहसोहळा पार पडला. आपल्या लग्नाचे फोटो चहलने सोशल मीडियावर पोस्ट केले असून ते चांगलेच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आयपीएलसाठी युएईला जाण्यापूर्वी चहलने कोरिओग्राफर असलेल्या धनश्री वर्माबरोबर साखरपुडा केला होता. त्यानंतर चहल हा आयपीएल खेळण्यासाठी युएईला गेला होता. त्यानंतर चहल ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता आणि तिथे वनडे आणि ट्वेन्टी-२० मालिका खेळला होता. पण ही मालिका संपवून मायदेशात परतल्यावर चहलने धनश्रीबरोबर आज लग्न केल्याचे पाहायला मिळाले.

चहल आणि धनश्री यांनी हिंदू पद्धतीने गुरगाव येथील कर्मा लेक रिसॉर्ट येथे आज लग्न केले. यावेळी त्याचबरोबर चहल आणि धनश्री यांच्या कपड्यांच्या रंगांमध्येही यावेळी सारखेपणा दिसला. चहलने धनश्रीला लॉकडाऊन सुरु असताना प्रपोज केले होते आणि त्यानंतर या दोघांनी काही दिवसांमध्येच साखरपुडा केला होता. आज अखेर या दोघांनी लग्न केल्याचे पाहायला मिळाले. धनश्री ही चांगली डान्सर आहे आणि तिच्या या कौशल्यावरच चहल फिदा झाला होता. त्यामुळेच चहलने धश्रीला लग्नाबाबत विचारले होते आणि त्यानंतर धनश्रीने चहलला होकार दिला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here