नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात ( ) सिंघू सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन ( farmers protest ) सुरू आहे. पंजाबमधील शेतकरी हरप्रीतसिंग हेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पण पंजाबमध्ये या कायद्यांवर भाजपच्या जाहिरातीत हरप्रीतसिंग यांचा फोटो आहे. म्हणजेच भाजपने ज्या शेतकऱ्याचा फोटो आपल्या जाहिरातीवर लावला आहे, तो गेल्या २ आठवड्यांपासून सिंघू सीमेवरील नवीन कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात बसला आहे. भाजपने आपल्या फोटोचा बेकायदेशीररीत्या वापर केला आहे, असा आरोप हरप्रीतसिंग यांनी केला आहे.

हरप्रीत हे पंजाबमधील होशियारपूरचे रहिवासी आहे. ते व्यवसायाने शेतकरी आहे आणि कलाकारही आहेत. हा फोटो आपण ६-७ वर्षांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. भाजपच्या जाहिरातीत हा फोटो वापरण्यात आला आहे, असं एका मित्राने व्हॉट्अॅपवरील चॅटमधून आपल्याला सांगितलं. फोटो वापरण्यापूर्वी आपली परवानगी घेतली गेली नाही. आता अनेक आपल्याला फोन करून भाजपचा पोस्टर बॉय म्हणून संबोधत आहेत. पण आपण भाजपचे नाही तर शेतकर्‍यांचे पोस्टर बॉय आहोत, असं ते सांगत आहेत.

गेल्या दोन आठवड्यांपासून सिंघू सीमेवर आंदोलनाला बसलो आहे. आणि आपल्या मूळ फोटोसह भाजपला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं ३५ वर्षीय हरप्रीत सिंग यांनी सांगितलं.

या जाहिरातीमधून किमान आधारभूत किमतीवरून (MSP) शेतकऱ्यांची शंका दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही जाहिरात भाजपच्या पंजाब युनिटने सोमवारी आपल्या फेसबुक पेजवर शेअर केली आहे. या जाहिरातीच्या एका कोपऱ्यात एक पंजाबी शेतकरी फावडं हातात घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. हा फोटो फोटो हरप्रीत सिंग यांचा आहे. हा फोटो जवळपास ७ वर्षांपूर्वीचा होता आणि भाजपाने परवानगीशिवाय सोशल मीडिया पेजवरून हा फोटो घेतला आहे, असं हरप्रीतसिंग म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here