नवी दिल्ली: दिल्लीतील सिंघू सीमेवर गेल्या काही दिवसांपासून शेतकर्‍यांचे आंदोलन ( ) सुरू आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन ( ) करण्यात येत आहे. किसान एकता मोर्चाच्या हँडलवरून एक फोटो शेअर करण्यात आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. या फोटोत ६२ वर्षांच्या मनजित कौर ( ) या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी स्वतः जीप चालवत ( ) आल्या. या फोटोवर बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूनेही प्रतिक्रिया दिली आहे.

किसन एकता मोर्चाने हा फोटो ट्विटरवर शेअर केलाय. ‘पंजाबमधील पतियाळा येथील ६२ वर्षीय मनजीत कौर या आंदोलनात सहभागी होण्यासाठी स्वतः जीप चालवत सिंघू सीमेवर पोहोचल्या आहेत, असं किसान एकता मोर्चाने म्हटलंय. हा फोटो तप्पसी पन्नूने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलाय. ‘चक दे फट्टे …’ अशी प्रतिक्रिया तिने या फोटोवर दिलीय. सिंघू सीमेवर आंदोलनासाठी अनेक शेतकरी पोहोचत आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट केली. शेतकरी संघटनांना दोन दिवसांपूर्वी एक पत्र पाठवण्यात आलं होतं. सरकार खुल्या मनाने शेतकरी संघटनांशी बोलण्यास तयार आहे. शेतकऱ्यांना बोलायचं असेल तर त्यांनी तारीख ठरवावी आणि आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असं तोमर म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here