वाचा:
ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृती दलाच्या अधिकाऱ्यांची बैठक आज होणार आहे. या बैठकीमध्ये करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
वाचा:
ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे खबरदारी म्हणून राज्यातील महापालिकांच्या क्षेत्रात मंगळवारपासून (दि. २२) रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या संचारबंदीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, ‘ सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्रीची संचारबंदी नाही. ग्रामीण भागातील करोना कृती दलाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेऊन रात्रीच्या संचारबंदीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे’.
वाचा:
दरम्यान, पुणे जिल्ह्यात पुणे आणि या दोन महापालिका असून या दोन्ही पालिका हद्दींत रात्रीची संचारबंदी सुरू झाली आहे. या संचारबंदीचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून दोन्ही शहरांत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात रात्री ११ वाजताच्या आधीच सर्व दुकाने व अन्य व्यवहार थांबले. अनेक भागांत रात्री ११ नंतर रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. ५ जानेवारीपर्यंत ही स्थिती आता अशीच राहणार असून करोनाचा धोका टाळण्यासाठी नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या उत्साहाला नागरिकांना मुरड घालावी लागणार आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times