वाचा:
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील जैन कच्छी भवनमध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात तक्रारी मांडल्या. स्थानिक शासकीय समित्यांवर शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना योग्य संधी मिळत नसल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी बोलताना मंत्री देसाई म्हणाले, ‘राज्यात किमान समान कार्यक्रमानुसार महाविकास आघाडी सरकारचे कामकाज चालते. सरकारमध्ये तीनही पक्षांना स्थान असल्याने जिल्हा पातळीवरील शासकीय समित्यांमध्ये शिवसैनिकांना समान स्थान मिळाले पाहिजे. मात्र, सांगली जिल्ह्यात शासकीय समित्यांच्या निवडींमध्ये शिवसैनिकांवर अन्याय झाला आहे. याबाबत जिल्हाप्रमुखांसह अन्य पदाधिकाऱ्यांनीही माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याबाबत तक्रारी असतील तर त्या सोडवण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या जातील. मुख्यमंत्री त्यातून मार्ग काढतील, त्यामुळे कोणत्याही शिवसैनिकांवर अन्याय होणार नाही.’
वाचा:
संचारबंदीचे काटेकोर पालन व्हावे
संचारबंदी कुणाच्या मनाची लहर नव्हे. काही देशांमध्ये करोनाचा घातक विषाणू फैलावत असल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. करोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात रात्रीच्या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लोकांनी गर्दी करणे टाळावे, तसेच संचारबंदीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times