एस. जे. इंटरनॅशनल प्रस्तुत या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन दासबाबू यांनी केलं होतं. एका बंगाली व्यक्तीनं मराठी मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन करणं आव्हानात्मक असतं. पण, हे आव्हान त्यांनी यशस्वीरित्या पेललं. या मालिकेची कथा, पटकथा, संवाद आणि शीर्षक गीत अनिल हर्डीकर यांनी लिहिलं होतं तर शीर्षक गीत प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी गायलं होतं.
ही मालिका अभिनेते , , , , , आनंद अभ्यंकर, किशोर प्रधान, विजय कदम, विजय चव्हाण, सोनालिका जोशी, संतोष जुवेकर, अनिल हर्डीकर, अजित केळकर, उमेश कामत या कलाकारांच्या सहजसुंदर अभिनयानं सजली होती. आता ही मालिका १ जानेवारी, २०२१पासून ‘क्लासिक मनोरंजन’ या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होत आहे. रसिकांना सदर मालिकेचा नवीन भाग दर शुक्रवारी दुपारी २ वाजता पाहता येईल
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times