नवी दिल्ली: भारत-चीन सीमेवर गेल्या सात महिन्यांपासून असलेल्या तणावाच्या ( ) पार्श्वभूमीवर पूर्व लद्दाखमध्ये लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे ( general m m naravane ) यांनी उंच भागांना भेट दिली आणि भारताच्या एकूण सैन्य सज्जतेचा आढावा घेतला. भारतीय लष्कराच्या ( indian army ) अधिकृत सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. जनरल नरवणे यांनी प्रत्यक्ष ताबा रेषेला लागून असलेल्या रिचिन ला सह पूर्व लडाखमधील ( eastern ladakh ) आघाडीच्या चौक्या आणि भागांचा दौरा केला आणि लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील (LAC) सद्यस्थितीचा आढावा घेतला, अशी माहिती लष्कराच्या अधिकृत सूत्रांनी दिली.

पूर्व लद्दाखमधील विवविध भागात आणि उंच शिखरांवर शून्य डिग्री तापमानात भारतीय लष्कराचे सुमारे ५०,००० जवान तैनात आहेत. चीनच्या कुठल्याही आगळीकीला ठोस प्रत्युत्तर देण्यास हे जवान सक्षम आहेत. चीनने तेथेही मोठ्या संख्येत सैनिक तैनात केले आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.

‘फायर अँड फ्युरी’ कॉर्प्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या लेह येथील १४ व्या कोअरचे कमांडचे लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन यांनी लष्कर प्रमुखांना पूर्व लडाखमधील परिस्थितीची विविध बाजूंनी माहिती दिली. एका दिवसाच्या लेह दौर्‍यावर लष्कर प्रमुख जनरल नरवणे आज सकाळी ८.३० वाजता लडाखला पोहोचले. कडाक्याच्या थंडीत भारतीय सैन्याच्या तैनातीचा आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेणं हा लष्कर प्रमुखांच्या भेटीचा हेतू होता, असं सूत्रांनी सांगितलं.

“लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी रेचिन ला सह फायर अँड फ्युरी कॉर्प्सच्या समोरील भागांचा दौरा केला आणि एलएसीवरील परिस्थितीचा आढावा घेतला. लष्कराच्या सज्जतेची माहिती त्यांना फायर अँड फ्युरी कॉर्प्स आणि इतर स्थानिक कमांडर्सनी त्यांना माहिती दिली, असं भारतीय लष्कराने ट्विट करून सांगितलं.

जनरल नरवणे यांनी दुर्गम भागात तैनात असलेल्या जवानांशी संवाद साधला आणि त्यांचे मनोबल वाढवले. ‘समान उत्साहाने’ काम करत राहण्यासाठी लष्कर प्रमुखांनी जवानांना प्रोत्साहन दिलं, असं लष्कराने म्हटलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here