कोल्हापूर: व या दोन्ही देवस्थानच्या तिजोरीला संसर्गाचा मोठा आर्थिक फटका बसला. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ मंदिरे बंद असल्याने यंदा भाविकांकडून अर्पण होणाऱ्या सोन्या चांदीच्या दागिन्यांत मोठी घट झाली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलेल्या मोजणीत अंबाबाईला १९१ तोळे सोन्याचे तर ज्योतिबाला केवळ १८ तोळे सोन्याचे दागिने अर्पण झाले आहेत. चांदीचे दागिनेही गतवर्षीच्या तुलनेत कमी आहेत. ( Paschim Maharashtra Devasthan Samiti Latest News )

वाचा:

‘ ‘च्या अखत्यारित तब्बल तीन हजारावर मंदिरे आहेत. त्यामध्ये अंबाबाई व ज्योतिबा या प्रमुख देवस्थानांचा समावेश आहे. या देवस्थानाला भाविक मोठ्या प्रमाणात दागिने अर्पण करतात. त्याची दरवर्षी मोजणी केली जाते. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोजणीला थोडा उशीर झाला. बुधवारी देवस्थान समितीचे अध्यक्ष व सचिव विजय पोवार यांनी देवस्थानाला अर्पण झालेल्या दागिन्यांची माहिती जाहीर केली. हे ८३ लाखापेक्षा अधिक किंमतीचे दागिने असून गतवर्षीच्या तुलनेत ४२ लाखाने कमी आहेत.

वाचा:

देवस्थान समितीने दिलेल्या माहितीनुसार, एक एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत करवीर निवासिनी अंबाबाईला सोने व चांदीचे मिळून एकूण ७१ लाख तर जोतिबा मंदिराला १२ लाखाच्या किंमतीचे दागिने अर्पण झाले आहेत. अंबाबाईच्या खजिन्यात गेल्या वर्षभरात एक हजार १९१ तोळे सोने अर्पण झाले. सोन्याच्या दागिन्यांची किंमत ६४ लाख ४९ हजार ६१६ रुपये इतकी आहे. तर सात लाख २० हजार ५५ रुपयांच्या किंमतीचे १८ किलो चांदीचे दागिने भाविकांनी देवीच्या चरणी अर्पण केले. जोतिबा मंदिराला गेल्या आर्थिक वर्षात २७ तोळे सोन्याचे तर ७ किलो चांदीचे दागिने अर्पण झाले.

वाचा:

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सहा ते सात महिने मंदिरे बंद होती. त्यामुळे भाविकच न आल्याने दागिन्याच्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्यावर्षी एक कोटी २६ लाखाचे दागिने अर्पण झाले होती. यंदा त्यामध्ये तब्बल ४२ लाखाची घट झाली आहे. अंबाबाई आणि जोतिबा या दोन्ही मंदिरांमध्ये ही घट आहे. आता काही अटी पाळत मंदिरे उघडण्यात आली असून दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढली आहे. दागिन्यांच्या मूल्यांकनाचे काम मुंबई येथील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक पुरुषोत्तम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. समितीच्या खजानिस वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, चारुदत्त देसाई, राजाराम गरुड यांच्या उपस्थितीमध्ये मूल्यांकनाची प्रक्रिया झाली.

मागील काही वर्षात अंबाबाई व जोतिबा मंदिराला भाविकांकडून अर्पण दागिन्यांची किंमत

वर्ष व अर्पण दागिन्यांची किमंत रुपयांत

२०१३-१४ : ८६ लाख ४६ हजार ४१९ रुपये

२०१४-१५ : ६८ लाख ९२ हजार ८४५ रुपये

२०१५-१६ : एक कोटी ५७ लाख ४८ हजार ८५४ रुपये

२०१६-१७ : ८३ लाख ३० हजार ४५७ रुपये

२०१७-१८ : एक कोटी २६ लाख दोन हजार ५९३ रुपये.

२०१८-१९ : एक कोटी २६ लाख ४७ हजार ५०५ रुपये

२०१९-२० : ८३ लाख ७६ हजार ९९ रुपये

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here