म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः इंग्लंडमध्ये ‘सार्स कोविड २’ या विषाणूचा नवीन प्रकार ( ) आढळला असून त्याचा वेगाने प्रसार होत असल्याची माहिती आली आहे. मागील सुमारे एक महिन्याच्या कालावधीमध्ये युकेमधून मुंबईत ( uk return passenger ) आलेल्या नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, तसेच करोना विषयक लक्षणे आढळली तर त्वरीत वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

इंग्लंडमधून २५ नोव्हेंबर २०२० पासून जे प्रवासी मुंबईत आलेले आहेत, त्यांना पालिका प्रशासनाकडून खालीलप्रमाणे विनंती करण्यात आली आहे.

– या पालिकेच्या वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधावा. तसेच फॅमिली डॉक्टर, नजीकचे पालिका दवाखाने, आरोग्य केंद्र यांच्याकडे प्राथमिक वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.

– करोना संसर्गाची शंका दूर करण्यासाठी कोविड १९ चाचणी करुन घ्यावी. तसेच मास्कचा वापर, हातांची नियमित स्वच्छता, सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा कटाक्षाने अवलंब करावा. सोबत आपल्या कुटुंबाची देखील काळजी घ्यावी.

– कोणतेही लक्षणे, जसे की, ताप, कफ, श्वास घेण्यास त्रास होणे अथवा अन्य आजारांचेही कोणतेही लक्षण असल्यास घाबरुन जाऊ नये. त्वरीत पालिकेच्या ‘वॉर्ड वॉर रुम’ कडे संपर्क साधून आवश्यक ती माहिती द्यावी. वॉर्ड वॉर रुमच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करावी.

‘वॉर रुम’ चे दूरध्वनी संपर्क क्रमांक

ए कुलाबा : ०२२-२२७००००७, बी सँडर्हस्ट रोड ०२२-२३७५९०२३, सी काळबादेवी ०२२-२२१९७३३१, डी ग्रँट रोड ०२२-२३८३५००४, ई भायखळा ०२२-२३७९७९०१, एफ/दक्षिण परळ ०२२-२४१७७५०७, एफ/उत्तर माटुंगा ०२२-२४०११३८०, जी/दक्षिण वरळी ०२२-२४२१९५१५, जी/उत्तर दादर ०२२-२४२१०४४१, एच/पूर्व वांद्रे ०२२-२६६३५४००, एच/पश्चिम वांद्रे ०२२-२६४४०१२१, के/पूर्व अंधेरी ०२२-२६८४७०००, के/पश्चिम अंधेरी ०२२-२६२०८३८८, पी/दक्षिण गोरेगाव ०२२-२८७८०००८, पी/उत्तर मालाड ०२२-२८४४०००१, आर/दक्षिण कांदिवली ०२२-२८०५४७८८, आर/उत्तर बोरीवली ०२२-२८९४७३५०, आर/मध्य दहिसर ०२२-२८९४७३६०, एल कुर्ला ०२२-२६५०९९०१, एम/पूर्व चेंबूर ०२२-२५५२६३०१, एम/पश्चिम चेंबूर ०२२-२५२८४०००, एन घाटकोपर ०२२-२१०१०२०१, एस विक्रोळी ०२२-२५९५४०००, टी मुलुंड ०२२-२५६९४०००

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here