मुंबई: राज्यात आज ९३ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ३ हजार ९१३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ७ हजार ६२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील वाढून आता ९४.५१ टक्के इतका झाला असून अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ५४ हजारांपर्यंत खाली आला आहे. नवीन करोनाचे संकट घोंगावत असताना राज्यातील करोना संसर्गाचा उतरता ग्राफ खूप मोठा दिलासा देणारा ठरला आहे. ( Update )

वाचा:

ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळला आहे. त्यामुळे भारतात विशेष खबरदारी बाळगण्यात येत असून यात महाराष्ट्र सरकारही विविध आघाड्यांवर तातडीची पावले टाकत आहे. पालिका क्षेत्रांमध्ये लागू करण्यात आल्यानंतर सरकारने आता २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात ब्रिटनमधून महाराष्ट्रात आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे नवा करोना रोखण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात असताना राज्यातील करोनाची साथ वेगाने नियंत्रणात येताना दिसत आहे. आज नवीन बाधित रुग्णांच्या तुलनेत जवळपास दुप्पट रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

वाचा:

राज्यात आज ९३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा ४८ हजार ९६९ इतका झाला आहे. सध्या राज्यातील २.५७ टक्के एवढा आहे. आज राज्यात ३ हजार ९१३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून त्याचवेळी ७ हजार ६२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८ लाख १ हजार ७०० करोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.५१ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २२ लाख ७८ हजार ४७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख ६ हजार ३७१ (१५.५३ टक्के ) नमुने करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ८८ हजार ७२३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३ हजार ४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

जिल्ह्यात ४२७ नवे रुग्ण
ठाणे जिल्ह्यात बुधवारी ४२७ नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर नऊ रुग्ण दगावले. जिल्ह्यातील बाधितांचा आकडा २ लाख ४० हजाराच्या पुढे गेला असून बरे झालेल्या रुग्णांची संख्याही दोन लाख ३० हजाराच्या पुढे आहे. सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ४२४० इतकी आहे. तर आतापर्यंत ५९०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here