मुंबई: केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी अत्यंत महत्त्वाची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री यांनी केली आहे. ( )

वाचा:

मधील विषाणूमध्ये झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणासाठी विशेष सूचना केंद्राने केली असून त्यानुसार राज्यात हे सर्वेक्षण करण्यात येईल, असे टोपे म्हणाले. नवा करोना विषाणू अधिक संसर्गजन्य असल्याची आतापर्यंतची माहिती असून त्यामुळेच जराही वेळ न दवडता सर्वेक्षण हाती घेण्यात येत आहे, असे टोपे यांनी नमूद केले.

या सर्वेक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे…

– आरोग्य अधिकाऱ्यांकडून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात ब्रिटनमधून मुंबईत उतरलेल्या प्रवाशांची यादी राज्याला प्राप्त झाली असून ही यादी प्रत्येक जिल्ह्याला आणि महानगरपालिकेला पाठविण्यात आली आहे.

– संबंधित जिल्हा आणि महानगरपालिका या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करतील.

वाचा:

– या चाचणीमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात येतील. या तपासणीतून सदर विषाणू ब्रिटनमधील नवीन विषाणू स्ट्रेनशी मिळताजुळता आहे का, याची माहिती मिळेल.

– जे प्रवासी निगेटिव्ह आढळतील त्यांचा पाठपुरावा ते भारतात आल्यापासून पुढील २८ दिवस करण्यात येईल.

– या रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येऊन त्या सर्वांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात येईल. सर्व निकट सहवासितांची ते पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यापासून पाचव्या ते दहाव्या दिवसादरम्यान आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल.

– जे कुणी २५ नोव्हेंबरनंतर ब्रिटनमधून भारतात आले आहेत त्यांनी स्वतःहून आपल्या जिल्ह्याच्या वा महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागास संपर्क साधून या सर्वेक्षणात सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

वाचा:

केंद्राने दिल्या ‘या’ सूचना

ब्रिटनमध्ये पसरलेल्या ” (N501Y) या विषाणूची सध्या जागतिक पातळीवर भीती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उपाययोजना करण्याचे आदेश राज्यांना दिले आहेत. त्याअनुषंगाने राज्याच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक पावले उचलत गेल्या महिनाभरात ब्रिटनमधून महाराष्ट्रात आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण हाती घेतले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here