पिंपरी: महानगरपालिकेच्या ( Pimpri Chinchwad Municipal Corporation ) वायसीएम हॉस्पिटलमध्ये ( YCM Hospital Pimpri ) सुरक्षा रक्षकाने रुग्ण तरुणीचा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘मी पोलीस आहे’ असे म्हणत आरोपीने विनयभंग केला असून, याप्रकरणी कंत्राटी सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. मुंबईत अशीच घटना घडली असताना काही तासांतच राज्यातील हा दुसरा विनयभंगाचा प्रकार उघडकीस आल्याने रुग्णालयांमधील महिला सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. ( Latest News Update )

वाचा:

(वय ४७, रा. खडकी) असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी १९ वर्षीय पीडितेच्या वडिलांनी ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी सध्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मध्ये उपचार घेत आहे. सोमवारी (२१ डिसेंबर) या दिवशी आरोपी सुरक्षा रक्षकाने मी पोलीस आहे असे पीडित तरुणीला भासविले. त्यानंतर तिला वॉर्ड मधून बाजूला नेत त्याने तिचा विनयभंग केला.

वाचा:

पीडितेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी बुधवारी (२३ डिसेंबर) याबाबत पिंपरी पोलीस ( Pimpri Police ) ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे. महापालिकेत कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक नेमण्यावरून यापूर्वी अनेकदा वाद झाले आहेत. या कामाचे टेंडर कुणाला मिळावे यासाठीही अनेक नेते आमने सामने आले होते. त्यानंतर मर्जीतील ठेकेदाराला हे कंत्राट मिळवून दिल्याचेही बोलले जाते. आता वियभंगाच्या घटनेने रुग्णालतील महिला सुरक्षेसोबतच अन्य प्रश्नही निर्माण झाले आहेत.

वाचा:

दरम्यान, मुंबईत उपचाराच्या बहाण्याने वॉर्ड बॉयने एका तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर काही तासांतच पिंपरी चिंचवड मधील महापालिका हॉस्पिटल मध्ये तसाच प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक गणेश लोंढे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here