महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांमधील रिक्त पदाची भरती प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आलेली आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने राज्यात भरती प्रक्रिया थांबविण्यात आलेली आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ‘परंतु तसे असले तरी यावर तोडगा काढण्यासाठी कंपन्यांचे उच्चाधिकारी या नात्याने काय प्रयत्न केले’, असा प्रश्न विचारत डॉ. राऊत यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेत असल्याने त्याची माहिती ऊर्जा मंत्र्यांनी तिन्ही कंपन्यांकडून घेतली.
महावितरणमध्ये सध्या विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक यांच्या ७५०० रिक्त पदांची, महानिर्मिती कंपनीमध्ये ५०० रिक्त पदांची भरती प्रक्रिया रखडलेली आहे. तर महापारेषण कंपनीमध्ये ८५०० पदे रिक्त आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times