लंडनः करोना व्हारसच्या नवीन प्रकाराने ब्रिटन सावरत नाही तोच त्याहून अधिक संसर्गजन्य आणखी एक करोना व्हायरस ( new more coronavirus strain ) आढळून आला आहे. यामुळे ब्रिटन हादरलं आहे. दक्षिण आफ्रिकेतून ( south africa ) आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांमध्ये करोनाचा आणखी एक नवीन प्रकार आढळून आला आहे, अशी माहिती ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी बुधवारी दिली. यानंतर गेल्या दोन आठवड्यांत दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या सर्व नागरिकांना स्वत: ला आयसोलेट करण्याच्या सूचना ब्रिटन सरकारने दिल्या आहेत.

ब्रिटनमध्ये करोनाचा अतिशय झपाट्याने पसरणारा करोनाचा नवीन प्रकार आढळून आला. आता तिथे करोना व्हारसचा त्याहूनही अधिक संसर्गजन्य नवीन करोनाचा व्हायरस आढळला आहे. आतापर्यंत या नवीन करोना व्हायरचे २ रुग्ण आढळून आले आहेत.

नवीन करोना व्हायरसमुळे ब्रिटनमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अशाच प्रकारे नवीन व्हायरस दक्षिण आफ्रिकेतही वेगाने पसरत आहे. कदाचित यामुळेच ब्रिटनला करोनाच्या दुसर्‍या मोठ्या लाटेचा सामना करावा लागतोय, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. नवीन करोना व्हायरस पूर्वीच्या व्हायरसपेक्षा ७० टक्के अधिक वेगाने पसरतो, असं बोललं जातंय.

करोना व्हायरसचा एक नवीन प्रकार आढळून आला आहे आणि कदाचित त्यामुळे संसर्ग वेगाने वाढत आहे, असं दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या आठवड्यात सांगितले होतं. करोना व्हायरसचा नवीन प्रकार समोर आला आहे आणि तो अधिक संसर्गजन्य आहे, असं ब्रिटनने घोषित केलंय.

दक्षिण आफ्रिकेच्या प्रभावी जीनोमिक क्षमतेमुळे ब्रिटनमध्ये करोना व्हायरसच्या आणखी एका नवीन प्रकारचे दोन रुग्ण आढळून आहेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेत जाऊन आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये हा नवीन प्रकारचा करोना व्हायरस समोर आला आहे. त्याचे दोन रुग्ण आढळले आहेत, असं हॅनकॉक यांनी सांगितलं.

दरम्यान, नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे विरोधकांनी बोरिस जॉनसन सरकारला लक्ष्य केलं आहे. बोरिस हे दीर्घ काळापासून करोना व्हायरसच्या आड लपत आहेत. सरकारने शास्त्रीय दृष्टीकोणातून निर्बंध घातले पाहिजेत. आपल्या उणीवा लपवण्यासाठी सरकारने विनाकारण कुठलेही निर्बंध घालू नये, असं लेबर पार्टीने म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here