पुणेः एल्गार परिषदेच्या सभेला पुणे शहर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. येत्या ३१ डिसेंबरला एल्गार परिषदेने हा कायक्रम ( ) आयोजित केला होता. एल्गार परिषदेच्या अनेका कार्यकर्यांनी यासाठी अर्ज केला होता. पण पोलिसांनी त्यांना कार्यक्रमासाठी परवानगी दिलेली नाही.

विजयस्तंभाला अभिवादन; पास असणाऱ्यांनाच प्रवेश

करोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी एक जानेवारी येथे होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी पास असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार असून, नागरिकांना या ठिकाणी येण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. या परिसरात कोणत्याही संस्था आणि संघटनांना फलक लावण्यासही मनाई करण्यात आली आहे.

विजयस्तंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत विविध संघटनांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते.

या बैठकीत कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार ३१ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता भिख्खू संघाच्या उपस्थित धम्म वंदना होणार आहे. एक जानेवारीला धम्मदेसना बुद्ध वंदना, समता सैनिक दलाचे संचलन, मान्यवरांकडून विजयस्तंभाला अभिवादन केले जाणार आहेत. एक जानेवारीला दुपारी बारा वाजेपर्यंत हे कार्यक्रम होणार आहेत. पासेस असणाऱ्यांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. अन्य नागरिकांना निर्बंध असल्याचे डॉ. धेंडे आणि डंबाळे यांनी सांगितले.

या परिसरात कोणत्याही संघटना आणि पक्षांना फलक लावण्यास मनाई असणार आहे’ असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, राज्याच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार या ठिकाणी नागरिकांना गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले असून, जाहीर सभा, खाद्यपदार्थ आणि पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here