म. टा. प्रतिनिधी, नगर: यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी आता त्याच्याशी संबंधित आणि कार्यालयीन सहकाऱ्यांकडेही चौकशी सुरू केली आहे. बोठे याच्याकडील परवाना असलेले शस्त्र पोलिसांनी पूर्वीच जप्त केले असून, आता त्याचा शस्त्र परवाना कायम स्वरूपी रद्द करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या त्याच्या आयफोनचे लॉक उघडण्यासाठीही तज्ज्ञांची मदत घेण्याचा पोलिसांचा विचार सुरू आहे.

या गुन्ह्यात बोठे याच्या वतीने अटकपूर्व जामीन अर्ज करण्यात आला होता. मात्र, सत्र न्यायालयाने तो फेटळाला आहे. यावर अद्याप उच्च न्यायालयात आपील करण्यात आलेले नाही. न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नसल्याने पोलिसांकडून बोठेचा शोध सुरूच असला तरी पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागत नाहीत. पोलिसांची पथके या कामासाठी कार्यरत असल्याचे सांगितले जात असले तरी, तपासात काहीच प्रगती होताना दिसत नाही. बोठेचा आयफोन जप्त करण्यात आलेला असला तरी त्याचे लॉक उघडत नाही. त्यामुळे यासाठी मुंबईतील पोलिसांच्या प्रयोगशाळेतील तज्ज्ञांची मदत घेण्याचा विचार सुरू आहे. गंभीर गुन्हा दाखल झालेला असल्याने बोठे याचा शस्त्र परवाना कायमस्वरूपी रद्द करावा, अशी शिफारस तपास अधिकाऱ्यांनी केली आहे. पोलिस अधीक्षकांमार्फत ती जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविली जाऊ शकते.

बोठे गेल्या २२ दिवसांपासून फरार आहे. काही माहिती मिळते का, यासाठी पोलिसांनी त्याचे निकटवर्तीय आणि सहकाऱ्यांकडेही चौकशी सुरू केली आहे. गुन्हा घडला त्यावेळी आणि त्याआधी संपर्कात असलेल्या लोकांकडे चौकशी करण्यात येत असली तरी त्यातून अद्याप ठोस माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.

संपत्तीची चौकशी करा: अॅड. लगड

या प्रकरणातील मुख्य आरोपी बोठे याच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी येथील ज्येष्ठ वकील तथा माजी अतिरित्त सरकारी वकील सुरेश लगड यांनी केली आहे. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात लगड यांनी म्हटले आहे की, बोठे याने काही महिन्यांपूर्वी प्रकाशित केलेल्या वृत्तमालिकेची चौकशी करण्यात यावी. ही मालिका कशाच्या अधारे प्रकाशित केली, त्यातून काय साध्य होणार होते, याची चौकशी केली जावी. बोठे याला न्यायालयाकडून फरार घोषित करून संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली जावी. तसेच अटकपूर्व जामिनासाठी त्याच्याकडून उच्च न्यायालयात प्रयत्न केले जाऊ शकतात, तेथेही पोलिसांनी लक्ष ठेवावे, अशी मागणीही त्यांनी केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here