अहमदाबाद : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयची वार्षिक सर्व साधारण सभा अहमदाबाद येथे होत आहे. या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून IPL मधील संघांची संख्या वाढवण्या संदर्भातील बातम्या समोर येत होत्या. बीसीसीआयने आता यासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.

वाचा-

बीसीसीआयच्या ८९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आयपीएलमध्ये २०२२ ( ) पासून ८ ऐवजी १० संघ खेळतील असा निर्णय घेण्यात आला. आयपीएलमध्ये सध्या मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असे आठ संघ आहेत. हे आठ संघ २०२१च्या आयपीएलमध्ये कायम असतील. पण त्यानंतर म्हणजे २०२२च्या हंगामात आठ ऐवजी १० संघांमध्ये आयपीएलची चुरस पाहायला मिळणार आहे.

वाचा-

या वर्षी करोना व्हायरसमुळे आयपीएलचा १३वा हंगाम भारता ऐवजी युएईमध्ये घेण्यात आला. या वर्षी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवले.

वाचा-

नव्या संघाचा समावेश करण्यापूर्वी

बीसीसीआयकडे १० व्या फ्रँचायझींचा समावेश करण्यापूर्वी इतरही अनेक मुद्दे आहेत. कोची टस्कर्सचाही बीसीसीआयसमोर प्रश्न आहे, ज्याला १५०० कोटी रुपये देणं (मध्यस्थाद्वारे) आहे. आयपीएलमधून बाहेर झालेल्या डेक्कन चार्जर्ससोबत आयसीआयसीआयच्या नेतृत्त्वात मध्यस्थता अंतिम टप्प्यात आहे. आणखी एक मध्यस्थता पुण्याच्या सहारा वॉरियर्ससोबतही आहे.

वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here