आॅनलाईन कर्ज योजना, पाच मिनिटांत लाखांचे कर्ज, कागदपत्रांशिवाय तात्काळ कर्ज त्यावर सवलती अशा भूलथापांपासून लोकांनी सावध राहावे. जास्तीचा व्याजदर, छुपे चार्जेस, वसुलीचे अवैध मार्ग या शिवाय या निमित्ताने गोळा करण्यात आलेल्या आधार कार्ड, पॅनकार्ड, फोटो इत्यादीचा गैरवापर केला जात आहे. यात अनेक लोकांना लाखो रुपयांना गंडवले जात आहे.
याबाबत महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनने एक निवेदन जारी केले आहे. या गैरप्रकरांना वेळीच आळा घालावा अन्यथा यातून गरीब लोक प्रचंड मोठ्या प्रमाणावर लुटले जातील, असे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारला करण्यात आले आहे. या संदर्भात जर कोणा व्यक्तीच्या कांहीं तक्रारी असतील अथवा त्यांना कांहीं मार्गदर्शन हवे असेल तर त्यांनी msbef@yahoo.com या इमेल वर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनचे जनरल सेक्रेटर देवीदास तुळजापूरकर यांनी केले आहे.
वस्तुतः रिझर्व्ह बँकेने स्वतः पुढाकार घेऊन सक्रियपणे अशा व्यक्ती तसेच संस्थांचा छडा लावून पोलीस यांत्रणे मार्फत त्याला अटकाव घालायला हवा तसेच त्यांना कठोर शिक्षा करायला हवी. या विरोधात अभियान राबविले पाहिजे पण फक्त पत्रक काढून इशारा देऊन गप्प बसत आहे. त्यामुळे अशा फसवणुकीच्या घटना वाढतील, अशी भीती स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनचे जनरल सेक्रेटर देवीदास तुळजापूरकर यांनी व्यक्त केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times