वाचा:
वरून दुचाकीवरून जात असताना यांच्या पायावरून रिक्षा गेली. पुढे वाहतूक कोंडीमध्ये रिक्षाचा वेग मंदावताच त्यांनी रिक्षाला गाठले. रिक्षा चालकाला याबाबत जाब विचारताच भर रस्त्यात दोघांमध्ये बाचाबाची झाली. सिग्नल सुटल्यावर वाहतूक सुरू होताच हे दोघेही पुढे निघाले. मात्र यावर प्रकरण न मिटवता संतापलेल्या रिक्षाचालकाने रिक्षा वेडीवाकडी चालवून कर्डक यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत कर्डक दुचाकीसह खाली कोसळले आणि रिक्षाचालक पसार झाला. पाठीमागून येणाऱ्या कारचालकाने हा प्रकार चित्रित केला. त्याने सोशल मीडीयावर हा व्हिडिओ व्हायरल केला.
वाचा:
परिसरातील हा व्हिडिओ असल्याचे लक्षात येताच याबाबत देवनार पोलिसांना कळविण्यात आले. रिक्षाचा क्रमांक आणि इतर माहितीवरून पोलिसांनी (३४) याला गोवंडीमधून अटक केली. रिक्षा चालवून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सलमान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे देवनार पोलिसांनी सांगितले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times