दिल्ली विमानतळावर रॅपिड अँन्टीजेन टेस्ट दरम्यान ४७ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आली. पण त्यांचा २२ वर्षीय मुलगा करोना निगेटिव्ह निघाला. ब्रिटनच्या विमानंवर बंदी घालण्यापूर्वी परतलेल्या प्रवाशांच्या चाचणी दरम्यान ही महिला पॉझिटिव्ह आढळली. या महिलेला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लक्षणं दिसत नसल्याने होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ही महिला बुधवारी रात्री एपी स्पेशल एक्स्प्रेस ट्रेनमधून आपल्या मुलासमवेत दिल्लीहून राजमुंद्री येथे पोहोचली.
रेल्वे पोलिस आणि आरोग्य कर्मचारी त्यांना रेल्वे स्टेशनवरून थेट रुग्णालयात घेऊन गेले. आम्ही आई आणि मुलाची आरटीपीसीआर चाचणी घेतली आहे. त्यांचे नमुने पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवण्यात आले आहेत. मुलाची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. पण या दोघांमध्ये व्हायरसची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत, असं जिल्हा वैद्यकीय व आरोग्य अधिकारी के. व्ही. एस. गौरीश्वरा म्हणाले.
आपल्या कुठलीही लक्षणं नाहीत आणि स्वतःच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला असं शिक्षक असलेल्या या महिलेने अधिकाऱ्यांना सांगितलं. या महिलेने एसी फर्स्ट क्लासमधून प्रवास केला आणि ट्रेनमध्ये इतर कुणीही तिच्या संपर्कात आली नाही, असं आंध्र सरकारने म्हटले आहे. दुसरा पॉझिटिव्ह व्यक्ती पंजाबमधील लुधियानातील आपल्या घरी पोहोचला. संबंधित पॉझिटिव्ह तरुण हा स्वतःहून लुधियानाच्या रूग्णालयात दाखल झाला. पण नंतर त्याला पुन्हा दिल्लीला पाठवण्यात आलं, असं वरिष्ठ अधिकारी संदीप कुमार यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times