वाचा:
टीआरपी घोटाळ्यामध्ये वाहिन्या, हंसा कंपनीनंतर आता ‘बार्क’ च्या माजी अधिकाऱ्यांचा सहभाग पुढे आला आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाचे सहायक पोलीस आयुक्त शशांक सांडभोर तसेच पोलिस अधिकारी यांच्या पथकाने ‘बार्क’चा माजी सीओओ रोमिल रामगडिया याला गेल्या आठवड्यात अटक केली होती. पोलिसांनी त्याचा मोबाइल, लॅपटॉप जप्त करून डीलिट केलेला डेटा पुन्हा मिळवला. या डेटावरून तो टीआरपी संदर्भांत वाहिन्यांना तांत्रिक माहिती पुरवत असल्याचे तसेच इतर अनेकांच्या याबाबत संपर्कात असल्याचे पुढे आले. इतर आरोपी तसेच त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी आज रायगड येथून ‘बार्क’चा माजी कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता याला अटक केली. पार्थो याला उद्या शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
वाचा:
टीआरपी घोटाळ्यात आतापर्यंत बरोबरच न्यूज नेशन, महामूव्ही, वॉव, फक्त मराठी, बॉक्स सिनेमा या वाहिन्यांचा सहभाग आढळला आहे. वाहिन्यांचे पदाधिकारी तसेच हंसा कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांची याप्रकरणात धरपकड करण्यात आली होती. मात्र ‘बार्क’चे माजी अधिकारी जाळ्यात अडकत असल्याने तपास पथकाची ही कारवाई आणखी काही दिवस अशीच सुरू राहणार असून मोठी नावे पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times