नाशिकः नाशिक जिल्ह्यातील भाविक पंढरपूरच्या दर्शनाला गेले होते. दर्शनावरून हे भाविक गावी परतल्यावर ते करोना पॉझिटिव्ह ( ) आढळून आले. याची माहिती ग्रामपंचायतीने पत्रक काढून दिली.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातल्या जानोरी गावचे २४ भाविक सायकलने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेले होते. हे सर्व भाविक गावी परतले आहेत. पण ते सर्वच्या सर्व करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या इतरांनाही करोनाची लागण झाली आहे. यामुळे गावातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून ३८ वर गेली आहे.
गावात २२ तारखेपर्यंत करोनाचे ३८ रुग्ण होते. गावातील करोना रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून ग्रामपंचायतीने पत्रक काढलं आहे. तसंच मास्क लावा आणि दोन व्यक्तींमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. तसंच घरी गेल्यावर हात साबणाने धुवावेत आणि रुग्ण वाढ होऊ नये याची दक्षता व्यावी, असं आवाहन जानोरी ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना केलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times