केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी १ जानेवारीपासून प्रत्येक वाहनांवर फास्टॅग लावणं सक्तीचं केलं आहे. १ जानेवारीपासून कार किंवा मोठी वाहनं फास्टॅग शिवाय राष्ट्रीय महामार्गांवरून टोल प्लाझावर पोहोचल्यास त्यांना मोठी किंमत मोजावी लागू शकते, असं मंत्रालयाने म्हटलं आहे.
दुप्पट टोल भरावा लागेल
फास्टॅगशिवाय टोल नाक्यावरील फास्टॅग लेनमधून गेल्यास दुप्पट टोल भरावा लागेल. फास्टॅगशिवाय वाहनांसाठी टोल नाक्यांवर एक लेन ही फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी आणि त्या लेनवरून गेल्यावर सामान्य टोल आकारला जाईल. फास्टॅग फक्त राष्ट्रीय महामार्गांसाठी (NH) आहे. आपण राज्य महामार्गाच्या टोलवरून गेलात, तर ते कार्य करणार नाही.
फास्टॅग हा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनवर (RFID) आधारित एक टॅग आहे. हा वाहनाच्या विंडस्क्रीनवर लावला जातो. वाहनांवरील हा फास्टॅग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वाचला जातो. टोल नाक्यावरील कॅमेरे हा फास्टॅग स्कॅन केला जातो आणि टोलची रक्कम आपोआप त्यातून कापली जाते. यानंतर टोलचं गेट उघडेल आणि कोणतीही अडचण येणार नाही. ही प्रक्रिया काही सेकंदात पूर्ण होईल.
मोबाइलप्रमाणे ऑनलाइन पेमेंट मोडमधून फास्टॅग रीचार्ज केला जाऊ शकतो. त्याशिवाय माय फास्टॅग अॅप किंवा नेटबँकिंगद्वारे फास्टॅगचे रिचार्ज देखील केले जाऊ शकते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times