‘रात्रीचाच असतो का’, असा सवाल करणाऱ्या मनसेला प्रत्युत्तर देताना, करोनाचा फैलाव होणारच नाही असे मुख्यमंत्री यांना तुम्ही लिहून द्या, मग रात्री किंवा दिवसा काय करायचे, याचा विचार करता येईल, अशा शब्दांत परिवहन मंत्री यांनी गुरूवारी मनसेला फटकारले.
ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोना विषाणूच्या नव्या प्रजातीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आला आहे. मात्र, या संचारबंदीवरून मनसेनेते यांनी राज्य सरकारवर टीका करताना ‘रात्रीचाच करोना असतो का’ असा सवाल केला होता. त्यांच्या या प्रश्नाला परब यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, अशाप्रकारचे प्रश्न विचारणाऱ्यांची मला कीव येते. टीका करण्याशिवाय दुसरे कोणतेच काम त्यांच्याकडे राहिलेले नाही. टीका करणाऱ्यांना टीकाच करायची आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपूर्ण राज्याची जबाबादारी सांभाळायची आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रत्येक पावले लोकांच्या काळजीसाठी आणि हितासाठी आहेत, असेही परब म्हणाले.
संक्रमण वाढू नये…
वर्षअखेरीस नाताळ किंवा नव्या वर्षानिमित्ताने रात्रीच्यावेळी फार मोठ्या प्रमाणात गर्दी होती. अशावेळी करोनाचा संक्रमण वाढू नये यासाठी संचारबंदी लागू केल्याचेही ते म्हणाले. ब्रिटनहून येणारा करोना विषाणू फैलावाची शक्यता लक्षात घेऊन याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्यमंत्री याबाबत काळजी घेत आहेत. त्याचबरोबर जे कामकाज सुरू झाले आहे ते थांबणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागत आहे, असेही ते म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times