मुंबई टाइम्स टीम

ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा जाहीर करण्यात आलं आहे. करोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग झपाट्यानं होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी, तिथं आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी मराठी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेलेल्या अभिनेता याला मायदेशी परतता येत नाहीय. ‘सध्या मी सुरक्षित आहे. पण, मला भारतात यायचंय’, अशा भावना त्यानं व्यक्त केल्या आहेत.

दौऱ्याविषयी संतोष सांगतो की, ‘मी २४ नोव्हेंबरला ‘डेट भेट’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला आलो. सिनेमाचं शूटिंग व्यवस्थित पार पडलं. सगळे जण आपापल्या घरी पोहोचले. पण, मी इथेच थांबलो. मला इकडच्या काही मित्रांना भेटायचं होतं. नेहमी त्यांच्याशी व्हिडीओ कॉल किंवा फोनवर गप्पा व्हायच्या. पण, आता लंडनमध्ये आहे म्हटल्यावर त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी मी इथेच थांबलो. तसंच माझी काही वैयक्तिक कामंही होती. २२ डिसेंबरला माझं परतीचं तिकीट होतं, पण ते विमान रद्द झालं. कारण, लंडनमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलंय.

भारतात जाणारं दुसरं कोणतं विमान आहे का? हे तपासलं. पण, दुर्दैवानं मला विमानाचं तिकीट मिळालेलं नाही. आता तर सगळीच विमानं रद्द झाली आहेत. करोनाचा नवीन विषाणू सापडला आहे, जो आधीच्या विषाणूपेक्षा जास्त वेगानं पसरत आहे. ३१ डिसेंबरपर्यंत विमानसेवा बंद आहे. ती कधी सुरु होईल माहीत नाही. मी माझ्या मित्राच्या घरी सुरक्षित आहे. पण, मला लवकरात-लवकर भारतात यायचं आहे. कामानिमित्त लंडनला आलेल्या भारतीयांना पुन्हा सुरक्षित भारतात आणण्यासाठी विमानं सोडण्यात येणार आहेत का? याचा मी पाठपुरावा करत आहे’.

भारत, इराण, कॅनडा यांनी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. अमेरिकेनेही बहुतांश बिगरअमेरिकी प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. सौदी अरेबिया, कुवेत आणि ओमान या देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. आतापर्यंत युरोपीय महासंघातील सर्व सदस्य देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here