लंडन: जगभरात करोनाच्या सावटाखाली ख्रिसमस साजरा केला जात आहे. करोनाचा संसर्ग फैलावू नये यासाठी अनेक देशांनी निर्बंध, नियम जारी केले असून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर, दुसरीकडे अनेक देशांमध्ये करोनाचा संसर्ग असताना कोणतेही निर्बंध लागू केले नाहीत.

करोनाचा सर्वाधिक संसर्ग अमेरिकेत फैलावला आहे. करोनाबाधितांची आणि करोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचा सर्वाधिक संख्या अमेरिकेत आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील राज्यांनी नियम तयार केले आहेत. ख्रिसमस सुट्टीनिमित्त बाहेर न पडता प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अमेरिकेत जवळपास ८.५ कोटी नागरीक प्रवास करणार असल्याचा अंदाज आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या जवळपास २९ टक्क्यांनी कमी आहे.

करोनाच्या नव्या विषाणूमुळे ब्रिटनने निर्बंध लागू केले आहेत. काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढत असल्यामुळे नाताळाच्या दिवशी देण्यात येणारी सवलत सरकारने रद्द केली. नवीन स्ट्रेन आढळण्यापूर्वी तीन कुटुंबांना एकत्र येत नाताळाचे सेलिब्रेशन करता येणार होते. मात्र, ही सवलत रद्द करण्यात आली.

संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या इटलीत निर्बंध लागू करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तू, हॉटेलशिवाय इतर दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. करोनाचा नवीन स्ट्रेन आढळलेल्या दक्षिण आफ्रिकेत समुद्र किनाऱ्यांवर जमण्यास मनाई करण्यात आली आहे.

ब्राझीलमध्ये याउलट परिस्थिती असल्याचे चित्र आहे. ख्रिसमसच्या दिवशी कोणतेही निर्बंध लागू झाले नाहीत. रिओ-दी-जनेरिओमधील हॉटेल, रेस्टोरंट्स बुक आहेत. तर, साओ पावलोमध्ये जीवनावश्यक वस्तू, सेवा उपलब्ध असणार आहेत.

वाचा:

दरम्यान, करोनाच्या थैमानाला अटकाव करण्यासाठी ब्रिटन, अमेरिका, रशियामध्ये लसीकरण सुरू करण्यात आले असताना दुसरीकडे करोनाच्या नव्या प्रकाराने आणखी चिंता वाढवली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, करोनाचा नवा स्ट्रेन हा वेगाने फैलावत आहे. त्यामुळे पुढील वर्षी करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याची भीती असून रुग्णालयांत जागा कमी पडेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. करोनाबाधितांच्या मृतांची संख्या वाढण्याचा धोका आहे

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here