नगर: प्रकरणातील फरारी आरोपी पत्रकार याचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या नगरमधील एका डॉक्टरला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. बोठे याच्या तपासासाठी गेलेल्या पथकाच्या हातीच हा डॉक्टर लागला आहे. डॉक्टरवर नगरमधील बँकांची आर्थिक फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचाही गुन्हा आहे. या प्रकरणात त्याने बोठेला मदत केल्याचा पोलिसांना संशय असल्याचे सांगण्यात आले. ( Updates )

वाचा:

रेखा जरे खून प्रकरणात फरार असलेल्या बाळ बोठे याच्या शोधासाठी सध्या पथके कार्यरत आहेत. २३ दिवसांपासून फरार असलेल्या बोठेला पकडण्यासाठी पोलिसांनी आता विविध मार्गांनी फास आवळला आहे. त्याच्या निकटवर्तीयांवर लक्ष ठेवण्यात येत असून अनेकांची चौकशीही सुरू आहे. त्याच दरम्यान पुणे येथून माहिती मिळाली त्याची खातरजमा करण्यासाठी गेलेल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या हाती हा डॉक्टर लागला आहे. या डॉक्टरच्या पत्नीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली. त्याप्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर नगरमध्ये सुरू केलेल्या एका मोठ्या रुग्णालयासाठी शहरातील विविध बँकांकडून त्याने कर्ज घेतले. मात्र, यामध्ये बँकांची आणि सहकाऱ्यांचीही फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यामुळे या प्रकरणातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी डॉक्टरने सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रयत्न केले. मात्र, यश आले नाही. जामीन फेटाळला असतानाही तो पोलिसांना गुंगार देत बराच काळ फरार होता. अखेर या गुन्ह्याचा तपास करताना तो पोलिसांच्या हाती लागला आहे.

वाचा:

रेखा जरे खून प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. आरोपीला पुणे येथून नगरला आणण्यात येत आहे. नंतर अधिक चौकशीत आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्ह्यात त्याला अटक केली जाणार आहे. मात्र, खून प्रकरणात त्याने बाळ बोठे याला मदत केली का? त्याचा काही संबंध आहे का, याचीही हे तपास पथक चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here