मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ५००६४ रुपये आहे. त्यात ८५ रुपयांची घसरण झाली. एक किलो ६७५१८ रुपये असून त्यात ५८ रुपयांची घसरण झाली. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ३८५ रुपयांनी वधारला असून तो ४९६२४ रुपये झाला होता. चांदीमध्ये देखील ११०२ रुपयांची वाढ झाली आणि एक किलोचा भाव ६६९५४ रुपये झाला.
ब्रेग्झिट पश्चात मुक्त व्यापार करार करण्यात ब्रिटन आणि युरोपीय समुदायाला गुरुवारी यश आले. हा करार करण्याची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपत होती. दोन हजार पानांच्या या कराराचा तपशील आगामी काही दिवसांत उपलब्ध होण्याची शक्यता असून, दोन्ही बाजूंच्या संसदेने त्यास मंजुरी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करता येणार आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात करार झाल्याची घोषणा केली.
good returns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८७१० रुपये आहे. २४ कॅरेट चा भाव ४९७१० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८७७० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५३२०० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४७२१० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५१५८० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९४१० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५२११० रुपये आहे.
गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीमध्ये वाढ झाली होती. एमसीएक्सवर तीन सत्रात चांदीमध्ये ३४०० रुपयांची वाढ झाली होती. तर तीन दिवसात सोने १००० रुपयांनी वधारले होते. जागतिक कमाॅडिटी बाजारात सोन्याचा भाव प्रती औंस १८७४.३ डाॅलर आहे. चांदीचा भाव प्रती औंस २५.८ डाॅलर आहे. अमेरिकन महासभेचे करोना व्हायरस-रिलीफ पॅकेज ९०० अब्ज डॉलर्सपर्यंत जाणार आहे. मजबूत डॉलर आणि कोव्हिड-१९ रुग्णांच्या नव्या लाटेमुळे विशेषत: युरोपमध्ये नव्याने लागलेले निर्बंधांमुळे जागतिक गुंतवणूकदारांची घालमेल वाढली आहे. भांडवली बाजारात अनिश्चितता वाढली असून गुंतवणूकदार सोन्याला पसंती देत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times