मुंबई : () सादर करण्यासाठी शेवटचा आठवडा शिल्लक आहे. अजूनही बहुतांश नोकरदारांना विवरण पत्रासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे केंद्र सरकार विवरण पात्र सादर करायला मुदतवाढ देतील, असा आशेवर जर तुम्ही असाल तर तसे करू नका. शक्य झाल्यास शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आयकर रिटर्न करा, असे आवाहन आयकर विभागाने केले आहे.

सोशल मीडियावर आर्थिक वर्ष २०१९-२० या वर्षाचा आयकर विवरण सादर करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र आयकर विभागाकडून करदात्यांना मेसेज, ई-मेल पाठवून कर विवरण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे.

आयकर विवरणसाठी अवघा शेवटचा आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे नोकरदारांची कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु आहे. दरवर्षी ३१ जुलैपर्यंत आयकर विवरण सादर करण्याची मुदत असते. मात्र यंदा करोना संकट आणि त्यात लागू केलेली कठोर टाळेबंदी यामुळे अर्थ मंत्रालयाकडून दोन वेळा मुदत वाढवण्यात आली होती. ३१ जुलैनंतर ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती. त्यात आणखी एक महिन्याची वाढ करून ३१ डिसेंबरपर्यंत कालावधी वाढवून दिला आहे.

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार २३ डिसेंबर २०२० पर्यंत ३ कोटी ९७ लाख आयटीआर रिटर्न सादर झाले आल्याचे म्हटलं आहे.उर्वरित करदात्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता तात्काळ आयकर रिटर्न भरावा असे आवाहन आयकर विभागाने केले आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या या आवाहनामुळे रिटर्न फायनलिंगला मुदत वाढ मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here