मुंबई: खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या येथून करोनाबाबत खूप मोठा दिलासा देणारी आणि तितकंच विरोधी लढ्याला नवं बळ देणारी बातमी हाती आली आहे. काही महिन्यांपूर्वी करोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या धारावीसाठी आजचा दिवस ‘शून्य करोना दिवस’ ठरला आहे. धारावीत आज करोनाचा नवा एकही रुग्ण आढळला नाही. ( Update )

वाचा:

धारावीला पडलेला करोनाचा विळखा ही सर्वांसाठीच चिंतेची बाब ठरली होती. मात्र ‘४-टी मॉडेल’ (ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटिंग) अमलात आणत धारावीने अत्यंत नियोजनबद्धरित्या करोनाविरुद्ध लढा दिला. राज्याच्या आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार महापालिकेने धारावीतील करोनाचा विळखा सैल करण्यासाठी अनेक आयुधे वापरली. दाट लोकवस्तीमुळे खडतर आव्हान असतानाही महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी जातीनिशी लक्ष घालत अत्यंत कुशलपणे स्थिती हाताळली. अर्थात त्याला धारावीकरांचीही उत्तम साथ लाभली. त्यामुळेच हाताबाहेर जात चाललेला धारावीतील करोना नियंत्रणात आला. या यशस्वी लढ्याची जागतिक आरोग्य संघटनेनेही दखल घेतली. महापालिकेच्या पाठीवर या संघटनेच्या कौतुकाची थाप पडली.

वाचा:

विशेष म्हणजे धारावीतील करोना साथीवर नियंत्रण आणल्यानंतरही तेथील स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळेच दैनंदिन रुग्णसंख्याही नियंत्रणात राखणे शक्य झाले आहे. या लढ्यात आजचा दिवस सर्वात खास ठरला आहे. गेल्या २४ तासांत धारावीत करोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. एप्रिल महिन्यानंतर धारावीत करोनाचा रुग्ण आढळला नाही, असं प्रथमच घडलं आहे. ही धारावीसाठी आणि मुंबईसाठीही सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी ठरली आहे.

धारावीत उरलेत फक्त १२ अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबईत करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर २० दिवसांनी १ एप्रिल रोजी धारावीत करोनाने शिरकाव केला होता. त्यानंतर धारावी झोपडपट्टीत वेगाने करोनाची साथ फैलावली होती. धारावीत आतापर्यंत ३ हजार ४६४ रुग्णांनी करोनावर मात केली असून आता फक्त १२ अॅक्टिव्ह रुग्ण उरले आहेत व त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. धारावी लगतच्या माहीम आणि भागातही गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here