नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यासाठी चार मोठे बदल केले आहेत. आणि पृथ्वी शॉ यांना खराब कामगिरीमुळे वगळण्यात आले आहे. साहाच्या जागी ऋषभ पंतला संघात घेतले आहे.

वाचा-

भारतीय संघातील या बदलावर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने खेळाडूंच्या मनात असुरक्षा निर्माण केली आहे. एडिलेट कसोटीत खराब फॉर्ममुळे साहाला मेलबर्न येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले. जर पुढील दोन सामन्यात अपयशी ठरला तर तुम्ही त्याला अशाच पद्धतीची वागणूक दिली जाणार का?

वाचा-

ही गोष्टी खुप वाइट आहे की साहाला फक्त एका कसोटीनंतर संघाबाहेर करण्यात आले. पंत दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात चांगला खेळला नाही तर तुम्ही परत साहाला संघात घेणार का? असा सवाल त्याने विचारला. यामुळे खेळाडूंच्या असुरक्षिततेचे वातावरण तयार होते. यामुळेच भारतीय संघ अस्थिर वाटत आहे. संघात कोणत्याही खेळाडूमध्ये सुरक्षेची भावना नाही. व्यवसाइक पातळीवर खेळताना सुरक्षेची भावना फार महत्वाची असते. देशासाठी खेळणारा प्रत्येक खेळाडू चांगला असतो.

वाचा-

वाचा-

भारत वगळता अन्य कोणताही संघ विकेटकिपर रोटेट करत नाही. पंत आणि साहा यांच्यावर गेल्या काही काळापासून अन्याय होत आहे. परिस्थितीनुसार त्यांची संघात निवड केली जाते. विकेटकिपर सोबत कधीच असे केले जात नाही. गोलंदाजांबाबत असे केले जाते.

वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here