औरंगाबाद: मधून गेल्या महिनाभरात महाराष्ट्रात आलेल्या सर्व प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण आरोग्य विभागाने हाती घेतले असतानाच लंडनहून येथे आलेली एक महिला पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेला तातडीने विलगीकरणात ठेवून उपचार सुरू करण्यात आले आहेत. महिलेचे स्वॅब नमुने पुणे येथील एनआयव्ही संस्थेत पाठवण्यात आले असून या महिलेला ब्रिटनमधील नव्या विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही, हे स्पष्ट होईपर्यंत सर्वांचेच श्वास रोखले गेले आहेत. ( )

वाचा:

ब्रिटनमधून भारतात आलेल्या प्रवाशांचा तपशील सर्व राज्यांना आणि संबंधित स्थानिक यंत्रणांना देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही असा तपशील आला असून पालिका प्रशासन व जिल्हा प्रशासनांना याबाबत सतर्क करण्यात आले आहे. त्यानुसार या सर्वच प्रवाशांचे राज्यात सर्वेक्षण सुरू असून लंडनहून औरंगाबाद येथे आलेल्या महिलेला करोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे.

वाचा:

मिळालेल्या माहितीनुसार, लंडनहून परतलेल्या या ५७ वर्षीय महिलेची केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यानंतर या महिलेला एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या महिलेचे स्वॅब नमुने पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत ( ) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर सदर महिलेला झालेली करोनाची लागण कोणत्या स्वरूपाची आहे हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, २५ नोव्हेंबरपासून आतापर्यंत ४४ व्यक्ती औरंगाबाद शहरात विदेशातून आल्या आहेत. त्या सर्वांचीच आता करोना चाचणी केली जाणार आहे. ४४ पैकी १३ जणांचा ठावठिकाणा लागत नसून त्यांच्या शोधासाठी पोलीसांची मदत घेतली जाणार आहे, असे सांगण्यात आले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here