मुंबई: राज्यात आज ७१ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात ३ हजार ४३१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर १ हजार ४२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी नवीन बाधित रुग्णांच्या तुलनेत करोनामुक्त रुग्णांची संख्या बरीच कमी राहिल्याने चिंतेत आणखीच भर पडली आहे. दरम्यान, राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या ५६ हजार ८२३ इतकी आहे तर रिकव्हरी रेट ९४.४ टक्के एवढा आहे. ( )

वाचा:
राज्यात करोनाचा ग्राफ उतरता असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अचानक घटले आहे. रोजचा नवीन बाधितांचा आकडा ३ हजारच्या वर असताना गेले दोन दिवस तुलनेने करोनामुक्तांचा आकडा बराच खाली आला आहे. आज दिवसभरात फक्त १ हजार ४२७ रुग्णांनाच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले तर त्याचवेळी ३ हजार ४३१ नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत एकूण १८ लाख ६ हजार २९८ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.४ टक्के इतके झाले आहे.

वाचा:

राज्यात आणखी ७१ जणांचा करोनाने मृत्यू झाला असून आतापर्यंत करोना संसर्गाने ४९ हजार १२९ रुग्ण दगावले आहेत. मुंबईत सर्वाधिक ११ हजार ५६ रुग्णांना या आजारामुळे प्राणास मुकावे लागले आहे. राज्यातील सध्या २.५७ टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत करोनाच्या १ कोटी २४ लाख १ हजार ६३७ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून त्यातील १९ लाख १३ हजार ३८२ (१५.४३ टक्के) चाचण्यांचे अहवाल करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ४ लाख ७७ हजार ५२८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३ हजार ६९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा:

राज्यात सध्या ५६ हजार ८२३ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यात सर्वाधिक १४ हजार १४५ रुग्ण जिल्ह्यात आहेत तर जिल्ह्यात १० हजार २४६ आणि पालिका हद्दीत ८ हजार २१८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

ठाणे जिल्ह्यात ३५५ नवे बाधित

ठाणे जिल्ह्यात आज ३५५ नवीन करोना बाधित रुग्ण आढळले तसेच सात रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांचा आकडा दोन लाख ४१ हजार १४२ वर गेला असून करोनामुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या वाढून पाच हजार ९१७ इतकी झाली आहे. आज ४८६ रुग्ण करोनामुक्त झाले तर आतापर्यंत दोन लाख ३० हजार ९३८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ४२८७ इतकी आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here