मेलबर्न : 2nd test ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एडिलेट कसोटीत ३६ धावांवर ऑल आउट झाल्यानंतर भारताचा ८ विकेटनी पराभव झाल्यानंतर आता उद्यापासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होत आहे. मेलबर्न येथे होणारा बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताला मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे.

वाचा-

कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीत भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे आले आहे. त्यात जलद गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे मालिका खेळू शकणार नाही. त्यामुळे अजिंक्य रहाणेसमोर मोठे आव्हान असणार आहे.

वाचा-

गेल्या काही वर्षात भारतीय संघाचा एडिलेड कसोटीत झाल्याप्रमाणे पराभव झाला नव्हता. आता मेलबर्न कसोटीत चार सामन्यांच्या मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने चार बदल केले आहेत. पृथ्वी शॉ आणि वृद्धिमान साहा यांना वगळण्यात आले असून शुभमन गिल, रविंद्र जडेजा, ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज यांना संधी दिली आहे.

वाचा-

पिच रिपोर्ट– मेलबर्न क्रिकेट मैदानावरील खेळपट्टी ही एडिलेड सारखीच असणार आहे. त्यामुळे जलद गोलंदाजांचा दबदबा पुन्हा दिसेल. अशा परिस्थितीत फलंदाजांची खरी कसोटी असेल. जलद गोलंदाजांसोबत चेंडू जुना झाल्यावर फिरकीपटूना विकेट मिळू शकतील.

वाचा-

हवामान- मेलबर्नचे हवामान स्वच्छ असेल. पावसाची कोणतीही शक्यता नाही. अधून मधून ढग येण्याची शक्यता आहे.

मैदानावरील आकडेवारी

एकूण कसोटी सामने- १११
प्रथम फलंदाजी करून विजय-५५
प्रथम गोलंदाजी करून विजय- ३९
पहिल्या डावातील सरासरी धावा- ३१०
दुसऱ्या डावातील सरासरी धावा- ३१२
तिसऱ्या डावातील सरासरी धावा- २५५
चौथ्या डावातील सरासरी धावा- १७५
सर्वोच्च धावसंख्या- ८ बाद ६२४
सर्वात कमी धावसंख्या- १० बाद ३६

वाचा-

एकूण लढती-९९
ऑस्ट्रेलिया- ४३ विजय
भारत- २८ विजय
ड्रॉ- २७

गेल्या पाच कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

ऑस्ट्रेलिया: मार्नस लाबुशाने-७६४, सरासरी- ८४.८९
भारत: मयांक अग्रवाल-३८५, सरासरी ४८.१३

गेल्या पाच कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे फलंदाज

ऑस्ट्रेलिया: मिचेल स्टार्क- २६ विकेट, सरासरी- १६.९६
भारत: उमेश यादव- १७ विकेट, सरासरी- २१.१८

मेलबर्न येथे होणारा दुसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार पहाटे ५ वाजता सुरू होईल. या सामन्याची नाणेफेक साडेचार वाजता होईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here